About Camera Type & Photograpy Institute

  • कॅमेरा घेताना 

फोटोग्राफीमध्ये करिअर करणाऱ्यांनी कॅमेऱ्याच्या प्रकारांची माहिती करून घेणं आवश्यक आहे. आपल्याला कोणती फोटोग्राफी करायची आहे, त्यानुसार कॅमेऱ्याची निवड करावी. साधे कॅमेरा तुम्हाला आता  अगदी पाच हजार रुपयांपासून उपलब्ध असून, उत्तम प्रोफेशनल कॅमेऱ्याची किंमत दीड लाखांपासून ते चार लाख रुपयांपर्यंत असू शकते. उच्च तंत्रज्ञानाने विकसित असलेले आणि विविध प्रकारचे कॅमेऱ्यांचा समावेश यामध्ये असतो. 

  • फोटोग्राफीचे प्रकार :- 
  • वाइल्ड लाइफ फोटोग्राफी 

निर्सगातील सौंदर्य अचूक पकडण्याची तुमच्याकडे अचूक क्षमता असायला हवी. झाडे, पाने, फुले, कीटक, प्राणी, जंगलातील वातावरण या गोष्टींना वाइल्ड लाइफ फोटोग्राफीमध्ये टिपाव्या लागतात. त्यामुळे या प्रकारच्या फोटोग्राफीसाठी तुमच्याकडे चिकाटी असायला हवी.

  • एडिटोरिअल फोटोग्राफी

 विविध वृत्तपत्रांमध्ये फोटोग्राफर आवश्यक असतात. अशा प्रकारचा फोटोग्राफर होण्यासाठी घटनेला असलेले महत्त्व (न्यूज सेन्स ) समजले पाहिजे. वृत्तपत्रांमध्येही तुम्ही फॅशन, स्पोर्ट्स, पेज थ्री अशा प्रकारचे स्पेशलायझेशन करता येऊ शकते. तुमच्यामध्ये न्यूज सेन्स, पटकन एखाद्या ठिकाणी जाण्याची तयारी असल्यास तुम्ही याप्रकारच्या फोटोग्राफीमध्ये काम करू शकता. 

  • इंडस्ट्रिअल फोटोग्राफी

इंडस्ट्रिअल प्लॅन्ट , प्रोजेक्टसाठी आवश्यक असलेली फोटोग्राफी, कंपन्यांची ब्रोशर्स, वेबसाइट्स यासाठी इंडस्ट्रिअल फोटोग्राफर करतात.  या प्रकारचे काम करण्यासाठी कंपनी, उद्योजकांच्या गरजा आणि तांत्रिक माहिती असणे गरजेचे असते. त्याशिवाय उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी अॅडव्हर्टायझिंग फोटोग्राफीही करता येते. 

  • फॅशन फोटोग्राफी 

फॅशन फोटोग्राफी करण्यासाठी तुमच्याकडे चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असली पाहिजे. बदलत्या फॅशन, ट्रेंड्स, फॅशन्सची माहिती आणि त्यासाठी आवश्यक असणारी सौंदर्यदृष्टी असणे गरजेचे आहे. 

  • फोटोग्राफी शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या इन्स्टिट्यूट

• नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फोटोग्राफी 

• इंटरनॅशनल स्कूल ऑफ फोटोग्राफी, नवी दिल्ली 

• इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट,एज्युकेशन अँड अॅडव्हान्स्ड स्टडीज,अहमदाबाद 

• फर्ग्युसन कॉलेज, पुणे  

 वैविध्यपूर्ण मध्यम असलेले फोटोग्राफी हे सर्जनशील (क्रिएटीव्ह) लोकांसाठी प्रसिद्ध मानले जाते. म्हणून वेगळ काही करण्याची इच्छा असेल तर फोटोग्राफी हे क्षेत्र महत्त्वपूर्ण आहे.  

 

Today's Thought : खूप माणसे यशस्वी हावू शकतात जर ते आपला वेळ चुका लपवण्या ऐवजी त्या सुधारण्यात घालवतील.

 

 

This template downloaded for