About Photography

पूर्वी लग्न समारंभ, बारसे, मुंजी अशा घरगुती समारंभापुरते मर्यादित असलेल्या फोटोग्राफीचे क्षेत्र आता विस्तारले आहे. जाहिरात, वाइल्डलाइफ, एडिटोरिअल फोटोग्राफी अशा क्षेत्रांमध्ये फोटोग्राफरना काम करता येते. फोटोग्राफीमध्ये करिअर करण्यासाठी फोटोग्राफी तंत्राशी ओळख असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे रंगसंगती, प्रकाश, भावनांची समज, कॅमेऱ्याच्या तांत्रिक बाजूची माहिती असणे गरजेचे आहे. लोकांशी योग्यप्रकारे संवाद साधण्याचीही कला अवगत असली पाहिजे. फोटोग्राफीची प्राथमिक माहिती घेतल्यावर त्यामध्ये स्पेशलायझेशन करण्याचा प्रयत्न करावा. 

मोबाइलमध्ये कॅमेरा आल्यानंतर आणि तुलनेने कमी किमतीत चांगल्या क्षमतेचे आणि भरपूर सुविधा असलेले कॅमेरे मिळू लागल्यानंतर आता जवळपास प्रत्येकच जण फोटोग्राफर झाला आहे. कामचलाऊ फोटोग्राफी अनेकांना येत असली, तरी बऱ्याच जणांना शास्त्रशुद्ध फोटोग्राफी करायची, शिकायची असते; पण, प्रत्येकालाच कोर्स करता येतो असं नाही. त्यामुळे मग चांगल्या पुस्तकांचा शोध घेतला जातो. आता वेगवेगळ्या प्रकारच्या फोटोग्राफीच्या टिप्स देणाऱ्या, तंत्र-मंत्र सांगणाऱ्या अनेक चांगल्या वेबसाइट्स उपलब्ध आहेत. या वेबसाइट्स फोटोग्राफीच्या कोर्सला पर्याय नक्कीच नव्हेत; परंतु, ज्यांच्याकडे कॅमेरा आहे, पण कोर्सला जाणं शक्य नाही, अशांसाठी त्या नक्कीच उपयुक्त ठरू शकतील.

 आपण त्यातल्या काही निवडक साइट्स पाहू. http://www.exposureguide.com/ ही फोटोग्राफीच्या पायाभूत तत्त्वांविषयी मार्गदर्शन करणारी एक छान साइट आहे. त्यावर कॅमेऱ्याचे कंट्रोल्स, मोड्स, मीटरिंग मोड्स यापासून व्हाइट बॅलन्स कसा राखावा, एक्स्पोजर कसं असावं, लेन्स आणि फोकसिंगची प्राथमिक माहिती, लेन्सचे फिल्टर्स कसे असतात, फ्लॅशचे प्रकार, फ्लॅश मीटरिंग अशा अनेक तांत्रिक बाबींची माहिती दिलेली आहे. त्याशिवाय विविध प्रकारच्या फोटोग्राफीच्या टिप्स आणि टेक्निकविषयीही या साइटवर विस्ताराने आणि उदाहरणादाखल फोटो देऊन माहिती देण्यात आली आहे. लहान बाळांचे, कुटुंबाचे, पक्ष्यांचे, फुलपाखरांचे, वन्यजीवांचे, पाळीव प्राण्यांचे, निसर्गाच्या वेगवेगळ्या रूपांचे, विविध खेळांचे, निरनिराळ्या कार्यक्रमांचे फोटो कसे काढावेत, याचं नेमकं मार्गदर्शन मोजक्या शब्दांत आणि उदाहरणं देऊन या साइटवर केलेलं आहे. याशिवाय इमेज एडिटिंगबाबतच्या काही टिप्सही दिल्या आहेत. http://modernphotographyschool.com/ या साइटवर प्रोफेशनल फोटोग्राफी, ट्रॅव्हल फोटोग्राफी, डिजिटल फोटोग्राफीचं मार्गदर्शन केलेलं आहे. http://photographyconcentrate.com/ हीदेखील फोटोग्राफी शिकवणारी एक चांगली साइट असून त्यावर काही तज्ज्ञांचे छोटे व्हिडिओही आहेत. वेडिंग फोटोग्राफी, अल्बम डिझायनिंग स्किल्स, प्रकाशयोजना, पोस्ट प्रोसेसिंग याविषयीच्या काही ट्युटोरियल्स त्यावर आहेत.

 फोटो एडिटिंग करण्यासाठी फोटोशॉप सॉफ्टवेअरची मदत घेतली जाते. पण, ते सॉफ्टवेअर जरी नसलं, तरी अनेक वेबसाइटच्या साह्यानंही आता सहज फोटो एडिटिंग करता येतं. http://pixlr.com/ ही त्यासाठीची एक महत्त्वाची साइट. आपल्या फोटोवर क्रॉपिंगपासून अनेकविध प्रकारच्या प्रक्रिया या साइटवर करता येतात. फोटोंचा कोलाज करणं, त्याला बॉर्डर टाकणं, त्यावर काहीतरी लिहिणं, फोटोला शेड देणं अशा अनेक प्रक्रियांचा त्यात समावेश आहे. या साइटचं फ्री अँड्रॉइड अॅपही उपलब्ध आहे. त्यामुळे मोबाइलवरही फोटो एडिटिंग करता येतं. http://ipiccy.com/ हीदेखील फोटो एडिटिंगसाठी चांगली साइट आहे.

My Services

HD PHOTOGRAPHY

HD SHOOTING

GRAPHIC DESIGNING

VIDEO EDITING

WEB DESIGNING

COMPUTER CLASSES

My Equipment

HD PANASONIC SHOOTING CAMERA

NIKON D 90 PHOTO CAMERA

This template downloaded fo